There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Adgul Madgul, ?????? ??????? ????? ??????

Release date: 15 April 2023
₹ 298 ₹ 350

(15% OFF)

(Inclusive of all taxes)
  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

‘अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीऽऽऽट लावू.’नातवाशी असं लाडे लाडे ... Read More

Product Description

‘अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीऽऽऽट लावू.’
नातवाशी असं लाडे लाडे बोलणारी आजी तुमच्या आठवणीत असेल कदाचित. त्या काळी घर मोठं आणि त्यात उतरंडीसारखी एका खालोखाल एक अशी मुलं असायची.
मुलांचं शिक्षण आणि संगोपन परस्पर पार पडायचं. मुलांवर संस्कार आपोआप घडायचे.
आज चित्र बदललेलं आहे. कित्येक घरी आपण दोघं व आपलं घरकुल असा आईबाबांचा सुटसुटीत आटोपशीर आजी-आजोबाविरहित संसार.
छकुल्याच्या संगोपनाची आणि जडणघडणीची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईबाबांची!
काही घरी आईबाबा दोघंही जाणार नोकरीवर आणि बालक राहणार पाळणाघरात!
परवडच परवड! बालकाची व त्याच्या आईबाबांची!!
धार नाही, आधार नाही! काही पालकांना सतत अपराधीपणाची भावना!
भावना कमी करायला आधाराचा हात म्हणजे अडगुलं मडगुलं!
भ्रूणावस्था, जन्म, नवजात बालकांचं पोषण, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य, त्यांचं बालसुलभ आचरण, त्यांच्या मनाचं व भावनांचं संगोपन, त्यांच्या तनाचा अन् मनाचा विकास, त्यांच्या संवेदना आणि आईबाबांकडून त्यांच्या अपेक्षा यांची 20 वर्षे वय होईपर्यंत अत्यंत सुसंगत नोंद म्हणजेच अडगुलं मडगुलं!
अडगुलं - मडगुलं म्हणजे बालसंगोपनाचं दैनिक पंचांगच!

Product Details

Title: Adgul Madgul, ?????? ??????? ????? ??????
Author: Dr. Shrikant Chorghade
Publisher: Saket Prakashan Pvt
SKU: BK0477752
EAN: 9789352203734
Number Of Pages: 296 pages
Language: Marathi
Binding: Paperback
Country Of Origin: India
Release date: 15 April 2023

About Author

डॉ. श्रीकांत चोरघडे डॉक्टर श्रीकांत चोरघडे नागपूरमधील अनुभवी व लोकप्रिय बालरोगतज्ज्ञ आहेत. १९६१ साली ते डॉक्टर झाले आणि १९६४ साली त्यांनी बालरोग या विषयातील पदविका (Diploma in Child Health) प्राप्त केली. त्यानंतर गेली ५० वर्षे ते या व्यवसायात आहेत. त्यांनी मानसशास्त्र या विषयात नागपूर विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (M.A.) प्राप्त केली आहे. 'तारांगण' या नावाचं निरामय शिशू चिकित्सा केंद्र त्यांनी १९७४ साली सुरू केलेलं आहे. हा उपक्रम आजही एक आगळावेगळा उपक्रम म्हणून नागपुरात जाणला जातो. बालकांचा सर्वांगीण विकास व बालकांच्या व्यक्तिमत्त्वविकासाबहल: तसेच त्यांच्या वर्तनसमस्यांबद्दल डॉ. चोरघडे यांचा विशेष अभ्यास आहे. 'तारांगण' निरामय शिशू चिकित्सा केंद्रात त्यादृष्टीने 'उद्याची चाहूल आज' हा उपक्रम राबवला जातो. बालकांना आजारपण येऊ नयेत या दृष्टीने पालकांना समुपदेशन केलं जातं. त्यात बालकांचा आहार केव्हा व कसा सुरू करावा, काय व किती प्रकारचे आहारघटक कशा पद्धतीने व किती प्रमाणात बालकांना दिले जावेत याविषयी मार्गदर्शन केलं जातं. त्यांना लिखाणाची आवड असून निरनिराळ्या दैनिकातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे व त्यांची विविध विषयांवर डझनभर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'अडगुलं-मडगुलं' या पुस्तकाचा हिंदी अनुवाद 'आपका अपना नन्हा मुन्ना व इंग्रजी अनुवादही 'It's My Baby' या नावाने प्रकाशित झाला आहे. सुविद्य पत्नी डॉ. सौ. माधवी, बालरोगतज्ज्ञ; डॉ. अमित हा मुलगा आणि डॉ. सौ. गिनी प्रियंका ही सूनबाई व चि, अद्वैत हा नातू आणि नात चि. कु. ओजस्विनी असा डॉक्टरांचा छोटासा सुटसुटीत संसार. जीवनावर, संगीतावर, निसर्गावर आणि लहान मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या लेखकाचं वास्तव्य 'राजीव’ धरमपेठ, नागपूर-४४० ०१० या ठिकाणी आहे.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed