Product Description
शिवरायांची व्यूहनीती यशस्वी ठरली ती त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामुळे. आपल्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रूंना नामोहरम केले व स्वराज्याची घडी उत्तम बसविली. उत्तम व्यवस्थापनामध्ये व्यूहरचना व व्यवस्थापन यांचा परस्परांतील मेळ, प्रसंगनिष्ठ चतुराई, साहाय्यक संघ, प्रकल्पाची पूर्वतयारी, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तडीस नेण्यात येणारी कामे, किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे शिवरायांनी दाखवून दिले.
स्वतःजवळ कुठलीही पुरेशी साधनसामग्री नसताना, बाकीचे मराठा सरदार परकीयांसमोर नतमस्तक होत असताना नि सारा समाज संभ्रमित-गलितगात्र झालेला असताना शिवाजी महाराजांनी जे ‘कल्पक धाडस' केले, त्या धाडसाच्या व्यूहरचना-प्रक्रिया आजच्या तरुणांना कळल्या पाहिजेत.
आजच्या 'कॉर्पोरेट जगता'चे नेतृत्व सुजाण तरुणांनी करावयाचे असेल, तर छत्रपतींच्या अनेक व्यूहनीतींचा साकल्याने विचार व अंगीकार करावा लागेल.
या पुस्तकात खालील मुद्द्यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे.
शिवरायांचे-
• नियोजन आणि व्यवस्थापन
• नेतृत्व आणि कार्यपद्धती
• अर्थशास्त्र आणि अर्थकारण
• दूरदृष्टिता आणि विचारसरणी
• आधुनिक धार्मिकता व कर्मयोग
• उत्तम चारित्र्याची कल्पना
Product Details
Title: | Chatrapati Shivaji Maharaj |
---|---|
Author: | Girish Jakhotiya |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9788177869644 |
SKU: | BK0356491 |
EAN: | 9788177869644 |
Number Of Pages: | 272 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2019 |