🚚 Free Shipping on orders above Rs.500
Recommended For You
Product Description
डॉ. डी. एस. कुलकर्णी यांनी लिहिलेले हे पुस्तक मधुमेह व हृदयरक्तवाहिन्यांचे विकार याच्याशी संबंधित ज्ञानाने खच्चून भरलेले आहे. या पुस्तकात असलेली मधुमेह व हृदयविकार या संबंधित जीवनशैली व आधुनिक उपचारपद्धतींची माहिती व ज्ञान यामुळे रुग्णांना खूप फायदा होणार आहे. तसेच या आजारांशी मैत्री करणे शक्य होईल व त्याद्वारे रुग्णांना या आजारांमुळे होणारा त्रास कमी होण्यासही मदत होईल, अशी माझी खात्री आहे.
त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये जीवनशैली व मधुमेहावरील आधुनिक उपचार याविषयी अगदी २०१३ पर्यंतचे शास्त्रीय संदर्भ दिलेले आहेत.
या पुस्तकाद्वारे मधुमेह रुग्ण, हृदयविकाराने त्रस्त असणारे रुग्ण व समाजातील इतर घटक या सर्वांना आरोग्यविषयक जाणीव निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.
या पुस्तकातून डॉ. कुलकर्णी उपयुक्त आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताणतणावाचे नियोजन, डॉक्टरी सल्ल्यानुसार मधुमेह व हृदयरोगाची नियमित तपासणी व योग्य उपचार करून आनंदी होण्याचा सल्ला देतात.
पुस्तकाच्या लिखाणाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
- डॉ. हेमंत फटाले,
मधुमेह व अंत:ग्रंथी विकारतज्ज्ञ.
मधुमेह हा हृदयविकाराचा सर्वांत जवळचा मित्र. मधुमेह झाल्याबरोबर हृदयविकार छुप्या पावलाने शरीरामध्ये प्रवेश करतो. हृदयविकार व रक्तवाहिन्यांचे आजार मधुमेहामुळे खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळेच हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढले आहे. मधुमेह झाल्यावर कमी वयात अधिक गंभीर हृदयविकार होतो. प्रथम हृदयविकारात मृत्यू होण्याचा संभवही खूप असतो.
या पुस्तकात डॉ. डी.एस. कुलकर्णी यांनी मधुमेह, हृदयविकार व रक्तवाहिन्यांचे आजार यांची अत्यंत शास्त्रशुद्ध सांगड घातली आहे. या पुस्तकामुळे समाजाचे प्रबोधन व्हावे ही प्रभूचरणी प्रार्थना करून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.’’
- डॉ. विलास पुंडलीकराव मगरकर,
डी.एम. (कार्डीओ), एम. डी. मेडिसिन
Product Details
Title: | Daibities V Hruday Raktvahinyanche Vikar |
---|---|
Author: | Dr. D. S. Kulkarni |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9788177869279 |
SKU: | BK0356463 |
EAN: | 9788177869279 |
Number Of Pages: | 248 pages |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2014 |