Product Description
इंद्रधनुष्य विजेते गोस्वामी तुलसीदास संतुलित भक्तिरहस्य वासना, दुर्वासना, नवासना यांच्या पलीकडे उपासनेची ओळख -गोस्वामी तुलसीदास रामभक्तांबाबत बोलायचे झाले तर मनात हनुमानानंतर सर्वांत आधी नाव येते तुलसीदासांचे! कृष्णभक्तामध्ये मीरा, सुदामा व सूरदास यांना जो दर्जा प्राप्त झाला आहे, तोच रामभक्तांमध्ये तुलसीदासांना प्राप्त झाला आहे. तसे पाहिले तर विश्वात अनेक भक्त होऊन गेले; पण ज्या भक्तांनी आपली भक्ती, भावना व समज लेखणीत उतरवली, ते जनसामान्यात सदैव अमर झाले. तुलसीदास यांच्या लेखणीतून रामभक्तीची गंगा पाझरली, ज्यामध्ये चिंब भिजून घेऊन आजही लोक पावन होत आहेत. प्रस्तुत पुस्तकात एक अनाथ बालक ‘रामबोला’ ते ‘गोस्वामी तुलसीदास’ होण्याच्या संपूर्ण जीवनयात्रेचे चित्रण आहे. त्याचबरोबर तुलसीदास यांनी लिहिलेल्या भक्ती, ज्ञान, नीती, लोकव्यवहार यांसारख्या गुणांवर आधारित काही रचना व त्यात दडलेली समज यांचे वर्णन आहे. या पुस्तकात तुलसीदासांच्या अनुपम चरित्रांबरोबर आपण खालील गोष्टीही जाणू शकाल – * भक्तांनाही विकार कसे घेरुन टाकतात? आसक्ती व प्रेम यात काय फरक आहे. * वास्तवात राम आणि हनुमान कोण? राम भेटावा, अशी भक्ती कशी करावी? * वासना, दुर्वासना, नवासना व उपासना यात काय फरक आहे. * भक्तीसाठी प्रपंच सोडणे आवश्यक आहे का? संन्यास व प्रपंच यांचे संतुलन साधता येते का? * प्रपंचात राहूनही माया व राम दोघांनाही कसे साध्य करता येते? चला तर, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुलसीदासांच्या रामनामाच्या गंगेत भिजून जाणून घेऊ! आपणही रामाच्या प्रेमात तुलसीदासांप्रमाणे प्रेममय होऊ!
Product Details
Title: | Goswami Tulsidas (Mar) |
---|---|
Author: | Sirshree |
Publisher: | Sakal Prakashan |
ISBN: | 9789395139793 |
SKU: | BK0480127 |
EAN: | 9789395139793 |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Perfect Paperback |
Reading age : | 18 years and up |
Release date: | 01 January 2023 |