15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
माणूस माणसाला का मारत असावा? हा प्रश्न मला अगदी लहानपणापासून सतावत आलाय. मी तीन वर्षांचा असताना माझ्या वडिलांचा खून झाला. त्यांना मारणारा खुनी कोर्टात सुटला. पुढं जेव्हा त्याचाही खून झाला तेव्हा आम्ही बंधू कुठे होतो याची चौकशी करायला पोलीस आले होते, त्यावेळी मला गंमत वाटली होती. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. माझ्या मनात तेव्हाही माणूस माणसाला का मारतो, हे कुतूहल होतंच. जीवशास्त्र शिकताना कुठलाही प्राणी कारणाशिवाय सजातीय किंवा विजातीय प्राण्यास मारत नाही, हे शिकलो होतो. माणूस जीवशास्त्रीय दृष्ट्या प्राणीच ठरतो, मग तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का वाटतो; हा प्रश्न मला पडू लागला.
सहज हाती येणारा पैसा, वेगानं होणारं शहरीकरण, दारूबंदीमुळं निर्माण झालेली परिस्थिती, शहरीकरणामुळं माणसांच्या गर्दीत राहूनही येणारी अलिप्तता आणि अनोळख यामुळं माणूस सहजगत्या गुन्हेगार बनतो असा अमेरिकन शास्त्रज्ञांनी निकर्ष काढला. वाढलेल्या पैशाला आलेली प्रतिष्ठा आणि पैसा म्हणजेच यश हे समीकरण, यातून अमेरिकेत वाढलेली गुन्हेगारी याचा उलगडाही या पुस्तकात होईल. दरम्यान गेल्या काही वर्षांत झपाट्यानं आपलं अमेरिकीकरण होऊ लागलं. भ्रष्ट राजकारणी, पोलिसांवर येणारा दबाव, पोलिसखात्यातील लाचलुचपत याही गोष्टी वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असताना ज्या मार्गानं अमेरिका गेली त्या मार्गानंच आपण जाऊ नये या जाणीवेतूनच हा लेखनप्रपंच.
सहज हाती येणारा पैसा, वेगानं होणारं शहरीकरण, दारूबंदीमुळं निर्माण झालेली परिस्थिती, शहरीकरणामुळं माणसांच्या गर्दीत राहूनही येणारी अलिप्तता आणि अनोळख यामुळं माणूस सहजगत्या गुन्हेगार बनतो असा अमेरिकन शास्त्रज्ञांनी निकर्ष काढला. वाढलेल्या पैशाला आलेली प्रतिष्ठा आणि पैसा म्हणजेच यश हे समीकरण, यातून अमेरिकेत वाढलेली गुन्हेगारी याचा उलगडाही या पुस्तकात होईल. दरम्यान गेल्या काही वर्षांत झपाट्यानं आपलं अमेरिकीकरण होऊ लागलं. भ्रष्ट राजकारणी, पोलिसांवर येणारा दबाव, पोलिसखात्यातील लाचलुचपत याही गोष्टी वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असताना ज्या मार्गानं अमेरिका गेली त्या मार्गानंच आपण जाऊ नये या जाणीवेतूनच हा लेखनप्रपंच.
Product Details
Title: | Gunhegarancha Jag :Marathi Books |
---|---|
Author: | Niranjan Ghate |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd |
SKU: | BK0477760 |
EAN: | 9789352203895 |
Number Of Pages: | 168 pages |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Country Of Origin: | India |
Release date: | 13 March 2023 |
About Author
निरंजन सिंहेंद्र घाटे जन्मतारीख - १०/०१/१९४६ शिक्षण - एम. एस्सी. (भूशास्त्र) व्यवसाय - लेखन प्रकाशित पुस्तके - 200 • महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून लेख व स्तंभ प्रसिद्ध. • अखिल भारतीय विज्ञानकथांच्या प्रातिनिधिक कथासंग्रहात कथा समाविष्ट. • विविध शालेय तसेच महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत लेख आणि कथांचा समावेश. • सृष्टीज्ञान, विज्ञानयुग, पैंजण, बुवा, अद्भुत-कादंबरी, ज्ञानविकास, किर्लोस्कर आदी मासिकांचे संपादन. विविध पारितोषिके व सन्मान १. 'अंटार्क्टिका' या पुस्तकास रा.द. आंबेकर विज्ञान पुरस्कार, १९९३ २. 'आधुनिक युद्धसाधने' या ग्रंथास पुणे मराठी ग्रंथालय - कै. अनंत सुर्वे स्मृती पुरस्कार, १९९२ ३. 'आत्मवेध' या ग्रंथास सार्वजनिक वाचनालय नाशिक - डॉ. वि.म. गोगटे पुरस्कार, १९९९ ४. केसरी मराठा ट्रस्ट - डॉ. वारदेकर स्मृती विज्ञाननिष्ठ प्रबोधन पुरस्कार, २००१ ५. इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे विभाग - डॉ. मो.वा.चिपळूणकर पुरस्कार, १९९७ ६. जगदीश गोडबोले स्मृती पर्यावरण लेखन पुरस्कार, २००२ ७. मराठी बालकुमार साहित्य परिषद कोल्हापूर - स्नेह पुरस्कार, जुलै २००२ ८. मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर - श्री. बा. रानडे पुरस्कार डिसेंबर २००२ ९. सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार - महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, जानेवारी २०१४ १०. 'ज्याचे करावे भले' या पुस्तकास बडोदा वाङ्मय परिषद, विनोदी साहित्य पुरस्कार, २०११ ११. 'विचित्र माणसांचे विश्व' या पुस्तकास गुरूवर्य मा.सी. पेंढारकर ग्रंथ पुरस्कार - लोकसेवा संघ पारले २००५-०६ १२. 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' या पुस्तकास उत्कृष्ट वाङ्मयमूल्य असणारी उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून विजया गाडगीळ पारितोषिक - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २०१७ १३. 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' या पुस्तकास कै. गोपीनाथ शिवराम पाटील स्मृती वाङ्मय पुरस्कार - जवाहर वाचनालय, कळवे-ठाणे, २०१७ १४. साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार, २०१८ - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ. महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेले पुरस्कार १. 'वसुंधरा' - भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान - प्रौढ वाङ्मय (१९७९-८०) २. 'स्पेसजॅक' - ललित विज्ञान - प्रौढ वाङ्मय (१९८५-८६) ३. 'एकविसावं शतक' - भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान - प्रौढ वाङ्मय (१९९७-९८) ४. 'जगाची मुशाफिरी' - सर्वसामान्य ज्ञान छंद व शास्त्र - बाल वाङ्मय (२००१-०२) ५. 'विज्ञानाने जग बदलले' - डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार -विशेष पुरस्कार (२००१-०२) ६. 'नवे शतक' - सी.डी.देशमुख पुरस्कार - प्रौढ वाङ्मय (२००४-०५) ७. 'विचित्र माणसांचे विश्व' - रेव्हरंड ना.वा. टिळक पुरस्कार - बालवाङ्मय (२००५-०६)