{"product_id":"ithethambane-nahi","title":"Ithethambane Nahi","description":"\u003cp\u003eपरमेश्वरी इच्छेवर अवलंबून न राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गोरख घोलप यांची स्फूर्तिदायक यशोकहाणी आगळी वेगळी ठरते. संघर्षात रडायचं नाही लढायचं! हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका महत्त्वाचा आहे. पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास, कुठल्याही अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी ठायी दिसून येते. ---डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आन् आम्ही या पुस्तकाचे लेखक) लेखक परिचय : रमेश गोरख घोलप २०१२ बॅचचे आय. ए. एस. अधिकारी. त्याचवर्षी एम. पी. एस. सी. मध्ये महाराष्ट्रातून प्रथम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करून भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले पहिले अधिकारी.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48819618218201,"sku":"BK0537948","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/51JF4hHvkqL._SL1000.jpg?v=1781593936","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/ithethambane-nahi","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}