You have no items in your cart

Enjoy Free Shipping on All Products!

Jonathan Livingston Seagull (Marathi)

Release date: 01 January 2017
₹ 150

(Inclusive of all taxes)
  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात, आपल्या कृतीतून जगण्याचे नियम बनवून यशस्वी होतात. त्यांची ही ग... Read More

Product Description

काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात, आपल्या कृतीतून जगण्याचे नियम बनवून यशस्वी होतात. त्यांची ही गोष्ट. नवी गोष्ट शिकणं आणि तिचा सराव करणं ही साधना आहे. साधनेत सातत्य हवे. सातत्याने सहजता येते. सहजतेतून पारंगतता मग जीवनाचे मुख्य मूल्य बनते. आयुष्य हा एक प्रवास आहे. त्याचे अदृश्य परिपूर्ण तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आनंदाचा साक्षात्कार. बहुतांशी समुद्रपक्ष्यांचं जगणं साधं सरळ असतं. दोन वेळेसच्या खाण्यासाठी धडपडणं, पोटाची खळगी भरणं म्हणजे जगणं नाही. छोट्या-मोठ्या कारणांसाठी आपसात भांडत राहणं, जिवंतपणाचं लक्षण नाही. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल इतरांसारखा सामान्य समुद्रपक्षी नव्हता. त्याच्यासाठी उडणं आनंदासाठी होतं. निर्दोष परिपूर्ण उडणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव. कामात पारंगतता आली की, मर्यादांच्या शृंखला गळून पडतात. याकरिता हवेत प्रचंड कष्ट, मेहनतीचा निरंतर ध्यास आणि आत्मबलाची साथ आणि हे सगळं घडतं फक्त कृतीच्या वर्तमान क्षणात; म्हणूनच प्रत्यक्ष वर्तमानाचा क्षणच महत्त्वाचा आहे. आवडीचं काम करणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. यातून हाती येतं अंतिम सत्य. अज्ञानाची भीती दूर सारून नव्या गोष्टी शिकत गेलो की, जगणं सुंदर बनत जातं. ही आहे एक दंतकथा. आपल्या दररोजच्या जगण्यातच आपलं ईप्सित शोधण्याचा मार्ग दाखविणारी गोष्ट. समुद्रपक्ष्यांचा कळप, त्यांचं उडणं. थव्यांचे रीतिरिवाज आणि कायदेकानून, इथं रूपक म्हणून आले आहेत. जर आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला, तर त्या क्षेत्रातल्या अत्युच्च शिखरावर पोहोचता येतं, हे जोनाथनच्या गोष्टीचं सार आहे.

Product Details

Title: Jonathan Livingston Seagull (Marathi)
Author: Richard Bach
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd.
ISBN: 9788177866254
SKU: BK0356262
EAN: 9788177866254
Number Of Pages: 120 pages
Language: Marathi
Place of Publication: India
Binding: Paperback
Release date: 01 January 2017

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed