Product Description
“जे लोक आज पुस्तके जाळतात ते एक दिवस माणसे जाळू लागतील.” अठराव्या शतकातील जर्मन लेखक हेन्रिक हें यांचं हे प्रसिद्ध वाक्य जणू या कादंबरीचा गाभा आहे असं म्हणता येईल. मानवी इतिहासात अनेक तत्त्वचिंतकांनी आणि तत्त्वप्रणालींनी ‘मी’, ‘स्व’ किंवा मानव एजन्सी असणं यांबद्दल महत्त्वाची मांडणी केलेली आहे. अर्थातच त्यांच्या एकंदर तत्त्वविचारातील तो एक घटक होता. असा घटक, ज्याचा विचार सामाजिक-राजकीय वास्तव, ते मानवी अस्तित्वविषयक प्रश्न, ते नैतिक मूल्यव्यवस्था, ते भावनिक प्रेरणाविश्व अशा व्यापक अवकाशावर पसरलेला होता. काही विचारवंतांचे ‘मी कोण’बद्दलचे असे काही विचार माझ्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे गुंफावेंत की, त्याला माझी म्हणून काही चौकात असावी, समकालीन राजकीय संदर्भ असावेत, हा लेखकाचा या साहित्यकृतीच्या निर्मितीमागचा हेतू आहे. असा प्रयत्न करणारं हे एक फिक्शन आहे, एक कल्पित आहे, थोडंसं ललितही आहे. या लिखाणाला कादंबरी म्हणता येईल की नाही याबद्दल जरी मतभेद संभवले तरी आजमितीस अनेक गोष्टींच्या व्याख्याच बदलत आहेत त्यामुळे कादंबरीच्या शैलीचा आणि आशयाचा हा एक नवीन प्रयोग म्हणता येईल. या कादंबरीत लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न सोपा नाही, या कोड्याला एकाच एक उत्तरही नाही. पण या कोड्याशी झुंजताना लेखकाला जे समाधान मिळालं, जो आनंद मिळाला तसाच आनंद कदाचित वाचकांनाही मिळेल. मात्र लेखकाचं म्हणणं समजून घेत, नव्या शैलीशी जुळवून घेत नेटाने वाचण्याची जिद्द मात्र हवी.
Product Details
Title: | Melelya Lekhakanchya Chaukashiche Prakaran |
---|---|
Author: | Makrand Sathe |
Publisher: | Popular Prakashan |
ISBN: | 9788194871491 |
SKU: | BK0472437 |
EAN: | 9788194871491 |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 01 January 2021 |