Product Description
"माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे याचं कारण त्याचा प्रगतिशील मेंदू आहे." हे विधान जितकं सोप्पं तितकंच पूर्णतः समजून घेणं कठीण. इतकी वर्षं न समजलेला मेंदू आत्ता कुठे मेंदू तज्ज्ञांना थोडा थोडा समजू लागला आहे. सर्वसामान्य व्यक्तीलाही मेंदूविषयी कुतूहल वाटतंच... मेंदू आणि मन वेगळं असतं का? मन म्हणजे मेंदू? की हृदय? की दोन्ही? विचार आणि भावना वेगळ्या आहेत का? माणसाचा एवढा लहानसा मेंदू एवढ्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या क्रिया कसा करतो? शास्त्रज्ञांचा / कलावंतांचा / खेळाडूंचा मेंदू वेगवेगळा असतो का? असे प्रश्न आपल्यालाही पडतातच ना... अशा अनेक प्रश्नांविषयी सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक आणि या बरोबरच आपल्या भावना समजून घेण्यासाठी... आवश्यक ते बदल स्वतःत घडवण्यासाठी... वेगवेगळ्या वयातलं आपलं मूल समजून घेण्यासाठी... आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्यासोबत असलेली आपली नाती समजून घेण्यासाठी... अखेरच्या श्वासापर्यंत आपला मेंदू तल्लख राहण्यासाठी... विचारांची आणि कृतीची दिशा देणारे पुस्तक डॉ. श्रुती पानसे शिक्षण सल्लागार, शिक्षण संशोधक, समुपदेशक, प्रशिक्षक आहेत.
Product Details
Title: | Menducha Password (Mar) |
---|---|
Author: | Shruti Panse |
Publisher: | Sakal Media Pvt. Ltd. |
ISBN: | 9789389834505 |
SKU: | BK0463611 |
EAN: | 9789389834505 |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Unknown Binding |
Release date: | 1 January 2021 |