Product Description
‘निळासावळा’ हा जी. ए. कुलकर्णी यांचा पहिला कथासंग्रह. हा संग्रह प्रसिद्ध होण्याआधीच जीएंच्या कथेने रसिकांचे लक्ष्य वेधून घेतले होते. या संग्रहाच्या रूपाने मराठी वाचकाला जी. ए. सापडले. मानवी दुःखाची अटळता, त्यांच्या समभावाची अतर्क्यता आणि प्रतिमांनी लवथवलेली अभिव्यक्ती हे जी. ए. यांचे विशेष या कथांमध्येही आढळतात. ‘चंद्रावळ’ आणि ‘गुंतवळ’ या आदिअंतीच्या दोनही कथांचे -- आणि जीएंच्या सर्वच यशस्वी कथांचे -- एक समान वैशिष्ट्य असे की, या एककेंद्री नाहीत की बहुकेंद्री नाहीत. त्या फिरत्या केंद्रांच्या कथा आहेत. कादंबरीचे बल घेऊनही कथाच राहणारी ही लघुकथा आहे. फिरत्या केंद्राचे हे आपले यश जीए यांनी ‘रक्तचंदन’पर्यंत वाढवतच नेले.
Product Details
Title: | Nilasawal (Mar) |
---|---|
Author: | G.A. Kulkarni |
Publisher: | Popular Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9788171859931 |
SKU: | BK0344618 |
EAN: | 9788171859931 |
Number Of Pages: | 122 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2011 |