There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Nirantar Safar (Mar)

Release date: 1 January 2023
₹ 299

(Inclusive of all taxes)

  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

श्री एम यांच्या आत्मचरित्राची म्हणजे ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ याची सुरुवात ‘य... Read More

Product Description

श्री एम यांच्या आत्मचरित्राची म्हणजे ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ याची सुरुवात ‘यात्रेचा शुभारंभ’ याने झाली तर याचा शेवट म्हणजेच ‘निरंतर सफर’ हे पुस्तक! आत्मचरित्र संपले म्हणजे प्रवास संपला असा होत नाही, तर तो प्रवास सुरूच राहतो, असे नमूद करून एक विलक्षण आणि अविश्वसनीय, अद्भुत अशी यात्रा यामध्ये मांडली आहे. ही जीवनयात्रा चित्तवेधक आणि मनाची कवाडे उघडणारी असून एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते. श्री एम यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 'वॉक ऑफ होप’ ही पदयात्रा केली. त्याद्वारे ‘मानव म्हणून जन्मलो आहोत, मानव होऊन जगा, माणुसकीसाठी प्रत्येक पाऊल उचला!’ हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. मुक्ती हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास आहे पण जगाचे कल्याण हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तुम्ही अमर, अकबर, अॅन्थनी कुठलाही आदर्शवाद निवडा. आपण सर्व जण एकच आहोत आणि सारखेच आहोत! हा विचार यात मांडला आहे. आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य नकारात्मक शक्तींने विभाजित न होता एकत्रितपणे घट्ट राहू! अशा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यातून दिला आहे. लेखकाविषयी : श्री एम यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे ६ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे गुरू श्री महेश्वरनाथ बाबाजी यांच्यानंतर त्यांनी १९९८पासून आपल्या गुरूंचे आध्यात्मिक कार्य पुढे सुरू ठेवले. त्यातूनच 'द सत्संग फाउंडेशन'ची स्थापना केली. या अंतर्गत प्राचीन योग विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारत योग विद्या केंद्राची उभारणी केली. आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जानेवारी, २०२०मध्ये श्री एम यांना 'पद्म भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Product Details

Title: Nirantar Safar (Mar)
Author: Sri M
Publisher: Sakal Prakashan
ISBN: 9789395139809
SKU: BK0480129
EAN: 9789395139809
Language: Marathi
Place of Publication: India
Binding: Paperback
Reading age : 18 years and up
Release date: 1 January 2023

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed