{"product_id":"outlive-mar","title":"Outlive","description":"\u003cp\u003eपुस्तकाविषयी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य अनुभवा ते तिशीत असतांना दीर्घायुष्य विषयातले प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. पीटर अटिया स्वतः मॅरथॉन जलतरणपटू होते. पण आपलं आरोग्य अजिबात चांगलं नाही, आणि आपण हृदयरोगामुळे अकाली मरण्याच्या मार्गावर आहोत, हा आश्चर्यकारक शोध त्यांना लागला. यातूनच दीर्घायुष्यामागचं रहस्य शोधण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. या प्रवासादरम्यान, आरोग्यसेवेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत गेला, हे या पथदर्शी संहितेत डॉ. अटिया यांनी मांडलेलं आहे. बहुतेक वेळा उपचार करायला उशीर झालेला असतो, तेव्हाच आरोग्यसेवा काम करू लागते. हा कालबाह्य मार्ग सोडून आपण व्यक्तिनिष्ठ, आणि प्रो-अॅक्टिव्ह पद्धतीने दीर्घायुष्यासाठीचा आराखडा तयार केला पाहिजे, असं डॉ. अटिया आवर्जून सांगतात. कृती करायची वेळ हीच आहे, असं ते मानतात. हा मार्ग म्हणजे दोन-चार युक्त्या नसून तो विज्ञानाधिष्ठित आहे. एकीकडे आयुर्मान वाढवत असतांना शारीरिक, संज्ञानात्मक, आणि भावनिक आरोग्य सुधारणं हेसुद्धा यात अभिप्रेत आहे. आउटलिव्हमध्ये वाचकांना निम्नलिखित गोष्टी सापडतीलः * तुमच्या रक्ताचे रिपोर्टर्स व कोलेस्टेरॉल नॉर्मल असूनसुद्धा तुमचं आरोग्य का बिघडलेलं असतं ? कारण सरासरी म्हणजे इष्टतम नव्हे. * व्यायाम हे दीर्घायुष्यासाठीचं सर्वांत शक्तिशाली औषध का आहे ? * तुम्ही विविध प्रकारचे आहार डाएट्स विसरून पोषणाच्या जैवरसायनशास्त्रावर लक्ष का केंद्रित केलं पाहिजे? तंत्रज्ञान आणि विदा वापरून स्वतःसाठी सर्वांत योग्य आहार कसा निवडायचा ? * शारीरिक आरोग्य आणि आयुर्मान वाढवतांना भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा शाप नाही. About Author डॉ. पीटर अटिया हे अर्ली मेडिकलचे संस्थापक आहेत. त्यांनी स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली, आणि जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. याखेरीज, एन.आय.एच. येथे सर्जिकल ऑन्कॉलॉजी फेलो म्हणून त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. तिथे मेलॅनोमा या त्वचेच्या कॅन्सरसाठी इम्युन-बेस्ड उपचारपद्धतींवर त्यांनी संशोधन केलं आहे. एजिंग या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाचे ते सदस्य आहेत, आणि द ड्राइव्ह या लोकप्रिय पॉडकास्टचे ते यजमान आहेत. बिल गिफर्ड हे ज्येष्ठ पत्रकार असून ते स्प्रिंग चिकनः स्टे यंग फॉरेव्हर ऑर डाय ट्राइंग या न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलरचे लेखक आहेत. त्यांचे लेख आउटसाइड, सायन्टिफिक अमेरिकन, मेन्स हेल्थ, व अन्य ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":46653737271513,"sku":"BK0522098","price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/71WPfQiIxYL._SL1500.jpg?v=1748346111","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/outlive-mar","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}