Product Description
हाउ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी हे वक्तृत्वकलेतील आणि व्यक्तिमत्त्वविकासातील एक अग्रगण्य तज्ज्ञ होते. त्यांच्या लिखाणामुळे व शिकवणूकीमुळे जगभरातील लाखो लोकांना आत्मविश्वासपूर्ण, प्रभावी आणि धैर्यशील व्यक्ती होण्यास मदत झाली आहे. वक्तृत्वकलेवरच्या या नेहमीच लोकप्रिय असणाऱ्या बेस्टसेलर पुस्तकामध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे : १. एखादे भाषण तयार करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या? २. तुमच्या भाषणाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यावे? ३. श्रोत्यांना तुमच्या संदेशाशी सहमत बनवण्यासाठी कसे उद्युक्त करावे? ४. तुमच्या भाषणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी देहबोलीचा योग्य वापर. 5. तुम्ही स्पष्ट केलेला मुद्दा श्रोत्यांच्या लक्षात राहण्यासाठी आणि त्यावर त्यांच्याकडून अपेक्षित कृती होण्यासाठी तुम्ही तुमचे बोलणे कसे संपवावे किंवा समारोप कसा करावा, या आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी. २१व्या शतकातील ही सुधारित आवृत्ती आर्थर आर. पेल. (पीएच.डी.) यांनी साकारली आहे. हे पुस्तक सुरुवातीला लिहिले गेले तेव्हापासूनचे बदल आणि सुधारणा यात केल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आजच्या वाचकांना माहीत असलेल्या समकालीन उदाहरणांचाही यात समावेश आहे. अनेक प्रसिद्ध (...आणि जरा कमी प्रसिद्ध) अशा वक्त्यांनी आपली भाषणे कशी वक्तृत्वपूर्ण बनवली त्याची अनेक उदाहरणेही या पुस्तकात समाविष्ट आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सारांश; तसेच भाषणाची योग्य मांडणी, भाषणाचे तंत्र, आवाजासाठी काही सरावपद्धती इत्यादींचा वापर करत टप्प्या-टप्प्याने आणि सहज अंगीकारता येतील अशा प्रात्यक्षिकांवर भर देणारे मार्गदर्शन या पुस्तकातून लाभते. डेल कार्नेगी यांच्या पुस्तकांचा ३६ पेक्षाही जास्त भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे आणि आजपर्यंत त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रतींची विक्रमी विक्री झाल्याची नोंदही आहे.
Product Details
Title: | Prabhavi Vakta Prabhavi Vakti |
---|---|
Author: | Dale Carnegie |
Publisher: | Saket Prakashan Pvt Ltd |
ISBN: | 9788177869675 |
SKU: | BK0356493 |
EAN: | 9788177869675 |
Number Of Pages: | 356 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 01 January 2014 |