15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
"आपले जीवन नाट्यात्मक आणि सकारात्मकरीत्या बदलण्याचे साधन आपण स्वत:च बनावे, याचा मार्ग आपल्याला शक्ती गवाइन पुरवित आहेत." -मदरिंग आपल्या जीवनात मानसिक चित्र आणि ठाम विधानांचा वापर करून सकारात्मक बदल घडवून आणण्याची कला म्हणजे सर्जनशील प्रतिमांकन. या कलेचा वापर आरोग्य, उद्योग-व्यवसाय, सर्जनात्मक कला, खेळ इत्यादी क्षेत्रात यशस्वीरीत्या केला जात आहे आणि खरेतर आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो. जगभरातून या पुस्तकाच्या सहा दशलक्षांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. चिरकाल लोकप्रिय राहणाऱ्या या नावीन्यपूर्ण आणि विक्रमी खपाच्या पुस्तकाने ते प्रकाशित झाल्यापासून व्यक्तिगत विकासाच्या, उन्नतीच्या दिशेने एक नवी चळवळ सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे. "माझा विश्वास आहे आणि मी स्वत:च्या आयुष्यातच पाहिले आहे की, सर्जनशील प्रतिमांकन कार्य करते." - ओप्रा विनफ्रे या अभिजात मार्गदर्शक पुस्तकात अमाप ध्यानपद्धती, सराव आणि तंत्रे देण्यात आली आहेत जी तुम्हाला तुमच्या सर्जनशक्तीच्या सामर्थ्याचा आणि सबकॉन्शस माइंडचा उपयोग करून हवे ते कसे मिळवता येईल यासाठी मदत करतात. नकारात्मक विचारशैलीत बदल कसा करता येईल, आत्मप्रतिष्ठा कशी वाढवता येईल, जीवनातील ध्येये कशी गाठता येतील, भरभराट कशी वाढवता येईल, सर्जनशक्ती कशी विकसित करावी, स्फूर्ती कशी टिकवावी, आरोग्य कसे सुधारावे, गहन शिथिलीकरण कसे साधावे, आणखी खूप काही जाणून घेण्यासाठी; तसेच जीवनावरील तुमची स्वत:ची पकड वाढवण्यासाठी हे पुस्तक तुमची मदत करेल.
Product Details
Title: | Secret Subconscious Mindche |
---|---|
Author: | Shakti Gawain |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352200221 |
SKU: | BK0379774 |
EAN: | 9789352200221 |
Number Of Pages: | 184 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2015 |