Product Description
"सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट.
मग खाली तपशील होतागेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत."
- प्रस्तुत पुस्तकातून
Product Details
Title: | Swaha |
---|---|
Author: | Narayan Dharap |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352200146 |
SKU: | BK0379768 |
EAN: | 9789352200146 |
Number Of Pages: | 240 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2018 |