25% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
amazon.comची सुरुवात भलेही सिएटलमधील एका गॅरेजमध्ये सामान्यतः पोस्टाच्या माध्यमातून पुस्तक-विक्रीद्वारे झाली होती; पण तिचे दूरदृष्टी संस्थापक, जेफ बेझोस, मात्र पुस्तक-विक्रेत्याच्या रूपात कधीही समाधानी नव्हते. ॲमेझॉनवर सर्वकाही उपलब्ध असावं, कमी किमतीत निवड करण्याचे असंख्य पर्याय असावेत आणि अत्यंत सुविधाजनक खरेदी करता यावी, अशी त्यांची इच्छा होती. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारची महत्त्वाकांक्षी आणि गुप्ततेची कॉर्पोरेट संस्कृती विकसित केली, जी आजपर्यंत कोणीही खंडित करू शकलं नाही. ज्या प्रकारे हेन्री फोर्डने उत्पादनात क्रांती आणली, त्याच प्रकारे किरकोळ विक्रीत क्रांती घडवणाऱ्या वेिशस्तरीय विशाल कंपनीची विस्तारपूर्वक सत्यकथा हे पुस्तक मांडतं. एका छोट्या स्टार्ट-अपपासून ते वेबवरील सर्वांत मोठा किरकोळ विक्रेता होण्यापर्यंतचा हा एक आकर्षक प्रवास आहे. आपल्या स्वप्नाला सत्यात रूपांतरित करण्याच्या बेझोसच्या दृढ संकल्पामुळे ग्राहकांची जीवन जगण्याची पद्धत कशी बदलली आहे, हे या प्रवासातून समजतं.
Product Details
Title: | The Everything Store (Mar) |
---|---|
Author: | Brad Stone |
Publisher: | Manjul Publishing House; First Edition |
ISBN: | 9789355430106 |
SKU: | BK0481434 |
EAN: | 9789355430106 |
Number Of Pages: | 560 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 25 August 2023 |