Product Description
स्टीव्हन्स या एका निष्णात बट्लरचं आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इंग्लंडमध्ये लयाला जात चाललेल्या या त्याच्या कोत्या विश्वाचं खोलवर भिडणारं चित्रण काझुओ इशिगुरो उभं करतात. तीन दशकं डार्लिंग्टन हॉलची सेवा केल्यानंतर एके दिवशी स्टीव्हन्स गाडी घेऊन शहराबाहेर प्रवासाला निघतो आणि तेव्हाच तो आपल्या भूतकाळाचीही सफर करू लागतो. लॉर्ड डार्लिंग्टन या 'महान सद्गृह स्था' ची सेवा करून आपण मानवजातीची फार मोठी सेवा के ली आहे, असा स्वतःलाच दिलासा देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मात्र, त्याच्या आठवणीत दडून बसलेल्या असतात त्या लॉर्ड डार्लिंग्टनच्या 'महानते' च्या खऱ्या स्वरूपाविषयीच्या शंका आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलचे त्याहूनही गंभीर असे संदेह.
Product Details
Title: | The Remains Of The Day (Marathi) |
---|---|
Author: | Kazuo Ishiguro |
Publisher: | Eka |
ISBN: | 9789389152029 |
SKU: | BK0422951 |
EAN: | 9789389152029 |
Number Of Pages: | 230 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 13 January 2020 |