🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
अश्विन संघी यांच्या `भारत सिरीज` मधील एक पुस्तक. लंडनमधील वाचनालयातील एका फळीवर पुट्ट्यांचे एक खोके सापडते. गोंधळलेल्या ग्रंथपाल ते खोके उघडतात. खोके उघडताच त्यांच्या तोंडून किंकाळी फुटते आणि त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतात. व्हॅटिकनमधील चक्रव्यूहासारख्या कुठल्याशा खबदाडीत, एक सुंदर मारेकरी तिच्या विक्षिप्त संप्रदायाविषयी श्रद्धा न बाळगणाऱ्या सर्वांना नष्ट करण्याची शपथ घेते. स्वतःला लष्कर-ए-तलतशार म्हणवणारं तेरा जणांचं सैन्य जगभर विखुरलेलं आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांचे दैव आणि या सैन्यातील सदस्यांचे दैव यांच्यात एक कुतूहलजनक साम्य आहे. त्यांचं ध्येय आहे आर्मागेडॉन. एका हिंदू ज्योतिष्याला आकाशातील विशिष्ट ग्रहांची युती जवळ आल्याचं लक्षात येतं. जगाचा अंत जवळ आल्याच्या जाणिवेने तो सुन्नपणे मान हलवतो. तिकडे तिबेटमध्ये एक बौद्ध भिक्खूंचा समूह ज्याप्रकारे त्यांच्या पूर्वजांनी ज्युदेआमध्ये ईश्वरपुत्राचा शोध घेतला होता त्याचप्रमाणे अवताराच्या शोधात निघतात. जेरुसलेममध्ये निर्माण झालेल्या या कोड्याची गुरुकिल्ली असते संघर्षाने ग्रस्त काश्मीरमधल्या रोझाबल नावाच्या एका कबरीत आणि ते कोडं सुटणार असतं वैष्णोदेवीत.
Product Details
Title: | The Rozabal Line |
---|---|
Author: | ASHWIN SANGHI |
Publisher: | MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD |
SKU: | BK0476801 |
EAN: | 9789357200264 |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Reading age : | 5 years and up |
Country Of Origin: | India |
Release date: | 31 March 2023 |