Product Description
विश्वविख्यात मार्गदर्शक लुईस एल. हे यांनी आजपर्यंत भीती, तणाव आणि अपराधभावाच्या दुष्टचक्रात अडकून स्वत:चे आयुष्य मर्यादित करून घेतलेल्या लाखो लोकांना मुक्त होण्यासाठी मदतीचा हात दिला. 'यू कॅन हील युअर लाइफ' या पुस्तकातील अनेक कल्पनांना प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने आकार दिला असून भावनिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता कशी विकसित करावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आपले पालक, जोडीदार किंवा सहकारी, आपल्या नातेसंबंधातले लोक नेहमी टीका करून आपल्याला बदलवण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आतपर्यंत रुजलेली नकारात्मक मानसिकता तयार होते.लुईस आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी प्रेरित करतात –• आपण काय करत नाही, ऐवजी - आपण काय करतो. • आपल्याला काय माहिती नाही, ऐवजी - आपल्याला काय माहिती आहे. • आपण काय नाहीत, ऐवजी - आपण काय आहोत.'यू कॅन हील युवर लाइफ' आणि इतर २६ पुस्तकांच्या लेखिका असलेल्या लुईस एल. हे या एक मार्गदर्शक आणि व्याख्याता आहेत.तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तुमच्या आयुष्याविषयी कोणत्या समजुती आहेत? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे म्हणजे "अंतर्शोध" असं आपण हजारो वर्षांपासून मानत आलो आहोत; पण अंतर्शोध म्हणजे काय?- लुईस एल. हे
Product Details
Title: | Tumchyatil Shakti Olkha |
---|---|
Author: | Louise L. Hay |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352200900 |
SKU: | BK0379790 |
EAN: | 9789352200900 |
Number Of Pages: | 208 pages |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Release date: | 01 January 2016 |