25% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
उचल्या'मुळे जितके आनंदाचे दिवस पाहिले तेवढेच दुःखाचे दिवस पण मला पहावयास मिळाले. काही लोकांना माझ्या मोठेपणामुळे जेवढे चांगले वाटले तेवढेच काहींना वाईटसुद्धा वाटले.
'उचल्या'मुळे विमुक्त भटक्या समाजाच्या समस्येला, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. 'उचल्या'चे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलगू, उर्दू भाषिकांना तर माझे अनुवादित पुस्तक वाचून 'डिनोटिफाइड ट्राइब्ज' जमातीच्या व्यथा प्रथमच कळल्या. यामुळे भारतातल्या अनेक विद्यापीठांना पुस्तके तर लागलीच; पण काहींनी तर 'उचल्या'वर पीएच.डी. करून डॉक्टरेटही मिळविली.
'उचल्या'चे देशातील विविध भाषांत अनुवाद झाले आणि त्या त्या भाषेमधील वेगवेगळ्या प्रांतातील हजारो वाचक आज माझ्यावर भरभरून प्रेम करत आहेत. यामुळे मला देशभर विविध साहित्याच्या कार्यक्रमांसाठी बोलावले जाते. अनेक दिग्गज साहित्यिकांशी आणि नेत्यांशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या गाठीभेटी झाल्या. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी भारताच्या चार पंतप्रधानांशी बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली.
- लक्ष्मण गायकवाड
Product Details
Title: | Uchalya |
---|---|
Author: | Lakshman Gaikwad |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352200948 |
SKU: | BK0379792 |
EAN: | 9789352200948 |
Number Of Pages: | 216 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2021 |