15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
तुमच्या कामात आणि आयुष्यात यशस्विता मिळविण्यासाठी दिशा दाखवणारे नियम.
काही व्यक्ती व्यवसायात इतरांपेक्षा जास्त आणि वेगाने यशस्वी का होतात? काही व्यवसाय भरभराटीस कसे येतात, जेव्हा की काही व्यावसायिक अपयशी ठरतात. सुप्रसिद्ध व्यावसायिक भाष्यकार व लेखक ब्रायन ट्रेसी यांनी या गोंधळवून टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. या व्यावहारिक मार्गदर्शकामध्ये त्यांनी यशस्वी लोकांच्या यशस्वितेमागील काही ‘‘त्रिकालाबाधित तत्त्वे’’ सांगितली आहेत.
100 अत्यंत महत्त्वाच्या नियमांमध्ये :
1. चांगल्या लोकांना आकर्षित करा,
2. चांगल्या उत्पादनाचे भरपूर उत्पादन व विक्री करा,
3. किमतींवर कौशल्याने नियंत्रण ठेवा,
4. मोठ्या प्रमाणावर उद्योगाचा विस्तार करा,
5. तुमचा नफा वाढवा आणि आणखी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत.
100 अतिशय सोप्या आणि व्यावसायिक क्षेत्रात आचरणात आणण्याजोग्या नियमांचे ट्रेसी यांनी येथे भांडारच खुले केले आहे. खऱ्या आयुष्यात अनुभवाला येणाऱ्या उदाहरणांनी त्यांनी प्रत्येक नियम कसा उपयोगात आणता येतो ते स्पष्ट केले आहे. व्यावसायिक क्षेत्रात अजमावता येणारी अनेक उदाहरणे त्यांनी वानगीदाखल दिली आहेत.
व्यावसायिकांना वाचण्यासाठी, समजण्यासाठी व उपयोगात आणण्यासाठी हे अतिशय उपयुक्त, थेट भिडणारे व आत्मविश्वास वाढवणारे पुस्तक ठरावे.
Product Details
Title: | Vyavsayatil Yashache Achuk 100 Niyam |
---|---|
Author: | Brian Tracy |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9788177869491 |
SKU: | BK0356478 |
EAN: | 9788177869491 |
Number Of Pages: | 304 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2014 |