Product Description
प्रत्येक व्यक्तीत अदृश्य, सुप्तशक्ती असते. ही सुप्तशक्ती म्हणजेच टेलिसाइकिक्स होय. टेलिसाइकिक्स हा अतिशय साधा, व्यावहारिक, तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक प्रकार आहे. याच्या उपयोगामुळे तुमच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतात. भविष्यातील घटना मनश्चक्षूच्या साहाय्याने कशा बघायच्या आणि त्या घटना प्रतिकूल असल्यास मानसिक सामर्थ्याने त्या अनुकूल कशा करायच्या, हे तुम्हाला या पुस्तकातून शिकायला मिळेल. तसेच सहावे इंद्रिय आणि इतर मानसिक शक्तींचे सामर्थ्य कसे वाढवावे, हेही समजेल. हे पुस्तक अतिशय व्यावहारिक आणि मुळापासून विचार करायला लावणारे आहे. ज्यांना ज्यांना आपल्या मनाची श्रीमंती अनुभवायची आहे, आपल्या आशाआकांक्षा आणि गरजा पूर्ण करायच्या आहेत त्या सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तुमच्या सुप्त मनाचे नियम योग्य पद्धतीने वापरले, तर तुम्हाला त्याचे परिणाम ताबडतोब दिसतील. या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणामध्ये वापरायला सहज सोपे असे तंत्र वाचायला मिळेल आणि ते वापरल्यानंतर तुम्हाला आयुष्यात सुख आणि समाधान मिळेल. दैनंदिन जीवनात आव्हानांना, अडचणींना, संकटांना आणि इतर समस्यांना सामोरे कसे जायचे, त्यांच्यावर मात कशी करायची, इतकेच नव्हे तर तुम्हाला तुमच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या असामान्य शक्ती योग्य वेळी, योग्य ठिकाणी कशा वापरायच्या हेही पुस्तकातून शिकायला मिळेल. तेव्हा या पुस्तकाच्या साहाय्याने तुमच्या मनातील सुप्तशक्तींचा शोध घ्या आणि सबकॉन्शस माईंडची जादू अनुभवा.
Product Details
Author: | Joseph Murphy |
---|---|
Publisher: | Saket Prakashan Pvt.Ltd. |
ISBN: | 9788177869972 |
SKU: | BK0356512 |
EAN: | 9788177869972 |
Number Of Pages: | 256 |
Language: | Marathi |
Binding: | Paper Back |
Reading age : | All |
Recently viewed
