Product Description
पालक होणं ही आयुष्यभराची अर्थपूर्ण आणि मोठी जबाबदारी असते. अर्थातच ती सोपी अजिबात नसते. पालकत्वाच्या या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवावे लागतात. कधी यशाची शिखरं खुणावतात, तर कधी अपयशाने निराश व्हायला होतं. कधी राग येतो, चिडचिड होते, तर कधी हृदय प्रेमाने भरून येतं. पण हा प्रवास करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. इतिहासात या आव्हानांचा सामना अनेकांनी केला आहे. त्यांच्या अनुभवांच्या साहाय्याने केलेली पालकत्वाबद्दलची ३६६ कालातीत चिंतनं द डेली डॅड पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. या चिंतनांना बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे यांच्या पालक असण्याच्या स्वानुभवाचाही भक्कम आधार आहे. हे पुस्तक तुम्हाला मौलिक सल्ले देतं, कधी कान टोचतं, कधी पाठीवर शाबासकीची थाप देतं आणि कधी युक्तीच्या चार गोष्टी सांगतं. या पुस्तकामुळे तुमचा पालकत्वाचा प्रवास सुकर होईल, हे निश्चित !
Product Details
Author: | Ryan Holiday |
---|---|
Publisher: | Madhushree |
SKU: | BK0522677 |
EAN: | 9788197768903 |
Number Of Pages: | 421 |
Language: | Marathi |
Binding: | Paper Back |
Reading age : | All |