Product Description
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • चिरतरुण राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
Product Details
Author: | Joseph Murphy |
---|---|
Publisher: | Saket Prakashan Pvt.Ltd. |
SKU: | BK0356240 |
EAN: | 9788177865967 |
Number Of Pages: | 272.0 |
Language: | Marathi |
Binding: | Paper Back |
Reading age : | Adult |
Recently viewed

The Power of your Subconscious Mind : The Power of your Subconscious Mind in Marathi आपल्या अवचेतन मनाची शक्ती
Joseph Murphy