Product Description
Yuddhachi Psychology (Marathi)/ युद्धाची सायकोलॉजीआयुष्य युद्धाचं मैदान आहे. कधी, कोणतं युद्ध समोर येऊन उभं राहील ते सांगता येत नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणी प्रत्येकाला युद्धासाठी तयार राहावं लागतंच. आजच्या आधुनिक युगातील ही सर्व युद्धं कौटुंबिकही असू शकतात आणि फायनान्शिअलही, युद्ध परिस्थितीशीही असू शकतं आणि आजाराशीही, सामना कमजोर लोकांशी होऊ शकतो आणि शक्तिशाली लोकांशीही. त्यामुळे कुठल्याही वळणावर सज्ज राहणं ही युद्धात जिंकण्यासाठीची पहिली अट आहे.युद्धाची सायकोलॉजी हे एक असे पुस्तक आहे ज्यामध्ये ‘‘मी मन आहे’’, ‘‘मी गीता आहे’’ आणि ‘‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’’ यांसारख्या अनेक बेस्टसेलर्सचे लेखक दीप त्रिवेदी तुम्हाला दैनंदिन जीवनातील युद्धांना सामोरे जाण्यासाठी सायकोलॉजिकली शक्तिशाली बनवतात. सोबतच ही युद्धं जिंकण्यासाठी ते खालील गोष्टी देखील स्पष्ट करतात: 1. युद्ध जिंकण्यासाठी मनाला बळकट कसं करायचं2. दुसऱ्यांवर दबाव टाकत विजय कसा प्राप्त करायचा3. प्रत्येक प्रकारच्या आधुनिक युद्धात विजय मिळवण्यासाठीचे सायकोलॉजिकल सिद्धांत आणि डावपेचनि:शंकपणे आयुष्यातलं प्रत्येक युद्ध एक असा माइंड गेम आहे ज्यामध्ये जिंकण्याकरिता वेगवेगळ्या सायकोलॉजिकल युक्त्या वापरणे आवश्यक आहे. आणि हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक प्रकारची आधुनिक लढाई... मग ती कौटुंबिक, आर्थिक (प्रॉपर्टि, बिजनस), वैद्यकीय किंवा कायदेशीर फ्रंटवर असो जिंकण्यासाठी अद्वितीय सायकोलॉजिकल शस्त्रांनी सुसज्ज करते.युद्धाची सायकोलॉजी हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती भाषांमध्ये सर्व प्रमुख बुक स्टोर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.
Product Details
Author: | Deep Trivedi |
---|---|
Publisher: | Aatman Innovations Pvt Ltd |
SKU: | BK0521117 |
EAN: | 9789384850029 |
Number Of Pages: | 208 |
Language: | Marathi |
Binding: | Paper Back |
Reading age : | All |