Product Description
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या शिखरांपर्यंत व तिथून पुन्हा समुद्रकिनारी असा एका योगी शिष्याचा अलौकिक प्रवास या आत्मकथनपर पुस्तकात सांगितला आहे. हे नुसते अनुभव कथन नसून गुरू बाबाजी व परात्पर श्रीगुरू बाबाजी यांचा शोध, त्यांनी दिलेला आध्यात्मिक बोध आणि त्यानंतर अंतिम सत्याच्या शोधाच्या प्रवासात आत्मविकसित होणाऱ्या एका योगी शिष्याचे हे अद्भुत चित्रण आहे. लेखकाविषयी : श्री एम यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे ६ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे गुरू श्री महेश्वरनाथ बाबाजी यांच्यानंतर त्यांनी १९९८पासून आपल्या गुरूंचे आध्यात्मिक कार्य पुढे सुरू ठेवले. त्यातूनच 'द सत्संग फाउंडेशन'ची स्थापना केली. या अंतर्गत प्राचीन योग विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारत योग विद्या केंद्राची उभारणी केली. आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जानेवारी, २०२०मध्ये श्री एम यांना 'पद्म भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतीच त्यांची दिल्ली आयआयटी येथील 'एनआरसीव्हीईई' विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Product Details
Title: | Himalaywasi Gurunchya Yogi Shishyache Atmakathan (Apprenticed To A Himalayan Master) (Mar) |
---|---|
Author: | Sri M |
Publisher: | Sakal Prakashan |
ISBN: | 9788196354039 |
SKU: | BK0480119 |
EAN: | 9788196354039 |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Perfect Paperback |
Reading age : | 18 years and up |
Release date: | 1 January 2023 |