15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग' हे डेल कार्नेगी यांचं सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तक आहे. कार्नेगी हे जगभरातील विख्यात सेल्फ हेल्प तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. वाचकांना अधिक आनंददायी आणि समाधानकारक जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करणं आणि त्यांना केवळ स्वत:बद्दलच नव्हे तर इतरांबद्दलदेखील अधिक जागरूकतेनं विचार करायला लावणं हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. वाचकांना आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी कार्नेगी दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेतात. या पुस्तकात वाचकांसाठी आहेत मन:शांती आणि आनंदाच्या मार्गावर नेणारा दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठीचे सात मार्ग - तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आठ शब्द जाणून घ्या. बदला घेताना चुकवावी लागणारी मोठी किंमत टाळा. कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता, केवळ दातृत्वाच्या आनंदासाठी देत रहा. जे मिळालंय ते मोजा, अडचणी मोजू नका. स्वत:ला ओळखा... पृथ्वीवर तुमच्यासारखं इतर कोणीही नाही हे कायम लक्षात असू द्या. लोकांनी दगड फेकून मारलेत ? तेच घेऊन महाल उभा करा! इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल असं एक तरी सत्कर्म रोज करा.
Product Details
Title: | How To Stop Worrying And Start Living (Marathi) |
---|---|
Author: | Dale Carnegie |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352203550 |
SKU: | BK0463066 |
EAN: | 9789352203550 |
Number Of Pages: | 288 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Reading age : | 15 years and up |
Release date: | 1 January 2022 |