Product Description
जुन्या सवयी सुटणे फार कठीण असते असे म्हटले जाते. म्हणजे सुरुवातीपासूनच्या आपल्या विचार करण्याच्या पद्धती बदलणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याचे त्यातून स्पष्ट होते. तरीही विचार आणि कृती करण्याच्या पद्धती बदलू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त केला तरी तुमच्या हातात आता जे पुस्तक आहे, त्याच्या वाचनाने त्या सवयी पूर्णपणे बदलता येतील, या विश्वासानेच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. एवढेच नव्हे तर ज्या पद्धतींमुळे अशा प्रकारे विचार करण्याच्या सवयी निर्माण झाल्या आहेत आणि त्यांना सतत पाठिंबा मिळत आहे त्या समूळ नष्ट करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे त्या पद्धतींवर आणि व्यवस्थेवर मुळातूनच घाव घालणे! आपल्या विचारांच्या समर्थनासाठी तयार केलेली स्पष्टीकरणांची भलीमोठी यादी आणि आपण उभारलेली संरक्षणयंत्रणा यामळे जी व्यवस्था आकारास आली, तिचे वर्णन एका शब्दात करता येईल : 'सबबी.' त्यामुळेच तुमच्या स्वतःसाठी आणि तम्ही निर्माण केलेल्या आणि स्वीकारलेल्या स्पष्टीकरणांसाठी चपखल उत्तर म्हणजे 'सवयी बदला, आयुष्य बदलेल! हे पुस्तक. या सर्व सबबी नाहीशा व्हाव्यात, हाच याचा उद्देश आहे! खरोखर, अगदी याक्षणी आणि येथेच तुम्हाला एक योग्य मार्ग मिळणार आहे. तुमची स्वतःची ओळख असलेले; परंतु आता तुम्हाला नकोसे असलेले व दीर्घकाळापासून जोपासलेले विचार तुम्ही दूर सारू शकता. तुमच्यामध्ये खोलवर रुजलेल्या विचार करण्याच्या सवयी तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचे व्यक्तित्व घडवण्याच्या आड येतात; पण आता तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जगू शकता - बस्स. सबबी सांगणं बंद करा आणि विचारसवयी बदला!
Product Details
Title: | Savayi Badala Aayushya Badalel: Marathi |
---|---|
Author: | Dr. Wayne W. Dyer |
Publisher: | Saket Prakashan Pvt Ltd |
SKU: | BK0356468 |
EAN: | 9788177869378 |
Number Of Pages: | 320 pages |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Country Of Origin: | India |
Release date: | 1 January 2014 |