Product Description
हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक तयार करताना अॅलन लॉय मॅगिनिस यांनी संपूर्ण इतिहासातील महान नेते, सर्वांत प्रभावशाली संघटना आणि अनेक विख्यात मानसशास्त्रज्ञांचा त्यांची प्रेरणादायक रहस्ये शोधून काढण्यासाठी अभ्यास केला. चित्तवेधक प्रसंग आणि रंजक गोष्टींचा वापर करून ते समजावून सांगतात की, बारा मुख्य तत्त्वे तुम्ही आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कशी वापरू शकता, ज्यामुळे तुम्हाला लोकांमधील सर्वोत्तमतेला बाहेर आणण्याचे समाधान मिळेल. "ज्या कोणाला इतरांबरोबरील आपले संबंध सुधारण्यामध्ये रस आहे त्या सर्वांना मी हे पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस करतो." -जॉन वुडन, यू.सी.एल.ए.चे पूर्व बास्केटबॉल प्रशिक्षक "मी या पुस्तकाच्या प्रेमातच पडलो! अॅलन लॉय मॅगिनिस आपल्याला निकोप, अनुभवसिद्ध आणि शक्तिदायक सिद्धांत देतात जो आपण लोकांना सर्वोत्तम ते होण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी वापरू शकतो. नक्कीच वाचले पाहिजे!" - झेव्ह सॅफ्टलास, लेखक, मोटिव्हेशन टॅट वर्क्स "जेव्हा असे म्हटले जाते की नेते जन्माला येत नसतात, बनविले जातात तेव्हा हे पुस्तक मला माहीत असलेल्या इतर कुठल्याही गोष्टीइतकेच त्यांना मदत करेल." - डेव्हिड हबार्ड, पूर्व अध्यक्ष, फुलर थिऑलॉजिकल सेमिनारी डॉ.अॅलन लॉय मॅगिनिस हे सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक, कौटुंबिक मानसोपचारतज्ञ, उद्योग सल्लागार, आणि लोकप्रिय वक्ते आहेत. ग्लेनडेल, कॅलिफोर्निया येथील व्हॅली काउन्सेलिंग सेंटरचे ते सह-संचालक आहेत आणि ऑग्सबर्ग बुक्सच्या द फ्रेण्डशिप फॅक्टर आणि कॉन्फिडन्स या पुस्तकांसह पन्नासहून अधिक पुस्तकांचे आणि अनेक लेखांचे ते लेखक आहेत.
Product Details
Title: | Vyaktine Sarvottam Kase Banvave |
---|---|
Author: | Alan Loy McGinnis |
Publisher: | Saket Prakashan Pvt Ltd |
ISBN: | 9788177867992 |
SKU: | BK0356368 |
EAN: | 9788177867992 |
Number Of Pages: | 184 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2013 |